Nagpur Ramtek news : मंदिरात प्रवेश केला म्हणून दलित तरुणाला मरेपर्यंत मारहाण; मित्र जखमी, नागपूरमधील घटना

0
16
Nagpur Ramtek news : मंदिरात प्रवेश केला म्हणून दलित तरुणाला मरेपर्यंत मारहाण; मित्र जखमी, नागपूरमधील घटना


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक खोब्रागडे व त्याचा मित्र फैजान हे दोघे रविवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास दुचाकीने रामटेकच्या प्रसिद्ध गडमंदिरात शोभायात्रा पाहायला गेले होते. दरम्यान, ही शोभा यात्रा संपल्यावर दोघे परत येत होते. यावेळी गडमंदिर मार्गावर या दोघांना मनीष भारती, जितेंद्र गिरी, सत्येंद्र गिरी व त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी अडवले. ‘तुम्ही दलित आणि मुस्लीम असूनही येथे का आला असा जाब त्यांनी दोघांना विचारला. ‘तुम्ही गाडीला धडक दिली. त्याच्या नुकसान भरपाईपोटी पैसे द्या’ अशी म्हणत टोळक्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले.



Source link