
Nagpur Car and Truck Collides: नागपूरमध्ये कार आणि ट्रक यांच्यात शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच गावातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला. जखमींला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली.






