Mumbai Water: मुंबईतील ‘या’ भागात ९ जानेवारीला कमी दाबाने तर पुढील २ दिवस गढूळ पाणी पुरवठा

0
18
Mumbai Water: मुंबईतील ‘या’ भागात ९ जानेवारीला कमी दाबाने तर पुढील २ दिवस गढूळ पाणी पुरवठा


मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. बोरिवली टेकडी जलाशयाचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याचे काम ९ जानेवारी रोजी दुपारी १ ते रात्री ९ दरम्यान होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आर मध्य, आर दक्षिण,आर उत्तर विभागातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच त्यानंतर पुढील दोन दिवस गढूळ पाणी येणार असल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे तसेच नागरिकांनी पाणी उकळून घेण्याचे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे.



Source link