Tuesday, August 18, 2026
Homeसातारासौ.दिपाली निलेश चांगण यांची सासकल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड

सौ.दिपाली निलेश चांगण यांची सासकल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी निवड

सासकल (साहस Times ): मौजे सासकल तालुका फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शिक्षणप्रेमी तथा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या दीपाली निलेश चांगण यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी दिनेश दत्तात्रय मुळीक यांची निवड झाली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीतील ग्रामपंचायत प्रतिनिधी हणमंत गंगाराम मुळीक, शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील असणारे अनिल संपत मुळीक, शंकर सदानंद मुळीक, नामदेव मुळीक, संदीप फडतरे, संगीता खोमणे, निकिता घोरपडे, रविना  देवघरे, वैशाली मुळीक,अमृता कवितके हे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक नारायण मदने, माधुरी मदने, शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर बल्लाळ, पदवीधर शिक्षक पांडुरंग निकाळजे, सहशिक्षक सुधीर ढालपे, रुपाली शिंदे, किर्ती निकाळजे ,संध्या गोरे उपस्थित होत्या. त्यांच्या या निवडीबद्दल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले उपसरपंच सोनाली मंगेश मदने, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments