
शेलार यांच्या या टीकेला मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं आहे. ‘आमच्या मराठी प्रेमाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचं मराठीप्रेम हे पुतनामावशीच प्रेम आहे. हिम्मत असेल तर त्यांनी गुजराथी ऐवजी मराठी माणसाला पंतप्रधान करावं, असं देशपांडे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘मराठी कलाकारांवर अन्याय होतो, तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं राहतं आणि कोण पाठीला पाय लावून पळतं हे महाराष्ट्राला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.





