[ad_1]
विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. दोन्ही मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. पदवीधर मतदारसंघातून उध्दव ठाकरे गटाचे अनिल परब यांनी २६ हजार २० मतांनी विजय मिळवला आहे तर शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांनीही निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे. मुंबईतील दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या असून महायुतीला पराभव सहन करावा लागला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातही ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांचाही विजय जळवपास निश्चित मानला जात आहे.
[ad_2]
Source link
