
Met Gala 2023 Unknown Facts: दरवर्षी जगभरातील फॅशन आणि मनोरंजन विश्वाचं संपूर्ण लक्ष एका सोहळ्यावर केंद्रित होतं, तो भव्य सोहळा म्हणजे ‘मेट गाला’. जगभरातील अनेक सेलिब्रिटी या भव्यदिव्य सोहळ्यात उपस्थित राहतात. इतकेच नाही तर, या सोहळ्यात सेलिब्रिटींनी परिधान केलेले आऊटफिट संपूर्ण वर्ष चर्चेत असतात. दरवर्षीच या सोहळ्यात अनेक चित्रविचित्र आऊटफिट्स पाहायला मिळतात. जवळपास सगळेच सेलिब्रिटी दरवर्षी मेट गालामध्ये असेच हटके पोशाख परिधान करतात आणि शेवटी ट्रोल होतात. पण, हे सेलिब्रिटी असे कपडे का घालतात हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. चला तर जाणून घेऊया या बद्दल…








