Maratha Reservation: मनोज जरांगेंचा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार; इगतपुरीत १०१ एकरवर जंगी सभा

0
16
Maratha Reservation: मनोज जरांगेंचा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार; इगतपुरीत १०१ एकरवर जंगी सभा


जरांगे यांची तब्बल १०१ एकरवर जाहीर सभा होणार असून या सभेचे आयोजन ६७ गावांच्या वतीने करण्यात आले आहे. इगतपुरी शहराकडून येणाऱ्या मराठा बांधवांसाठी साकूर फाट्यालगत कोठुळे पंपाजवळ ७० एकर रानावरती पार्किंगचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भगूरमार्गे येणाऱ्या लोकांसाठी गायरानावरती २५ एकरमध्ये पार्किंगची सोय करण्यात आली आहे. सिन्नरमार्गे येणाऱ्या लोकांसाठी कडवा पुलालगत ३५ एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था, ठीक ठिकाणी पिण्याचे पाणी व आरोग्यसुविधा, शौचालय उपलब्ध करण्यात आलेली आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीनेपाच हजार स्वयंसेवकांची नेमणूक या सभेसाठी करण्यात आली आहे.



Source link