Manoj Jarange : मराठ्यांना अंगावर घेऊ नका… मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा

0
18
Manoj Jarange : मराठ्यांना अंगावर घेऊ नका… मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना थेट इशारा


मनोज जरांगे पाटलांच्या सभेला परवानगी देऊ नका. जरांगे पाटलांच्या सभेमुळं हिंसाचार होऊ शकतो, अशी मागणी भाजप समर्थक एसटी कामगार नेते गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी केली होती. जरांगे पाटलांनी सदावर्ते यांना सुनावलं. ‘एसटी कामगाराच्या आंदोलनात यश मिळवण्यासाठी ह्याच सदावर्तेनं एक मराठा, लाख मराठा अशी घोषणा दिली होती. आता एक लाख मराठे एकत्र आलेत तर हा सांगतोय ते हिंसा करतील. त्यांना अटक करा. मराठ्यांची औलाद हिंसा करत नाही आणि मला अटक करणं आता सोप्पं आहे का, असा सवाल जरांगे पाटलांनी केला. ‘सदार्वर्तेला एकदा सुट्टी दिलीय. हाच सदावर्ते मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेला होता. त्यानं एकदा मराठ्यांचं वाटोळं केलंय. मराठ्यांविरोधात आग ओकायचं कमी कर, असं जरांगे पाटलांनी सदावर्तेंना सुनावलं.



Source link