
Maharashtra weather news : दक्षिण तमिळनाडूमध्ये हवेची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. या सोबतच अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होते असून यामुळे पूर्वेकडून येणारे वारे तीव्र होणार आहे. दरम्यान, याकहा परिमाण म्हणून दक्षिण, मध्य महाराष्ट्रातील हवेतील आर्दता वाढण्याची शक्यता आहे यामुळे राज्याच्या काही भागात पुढील चार दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सोमवार ते बुधवार दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि गोव्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.





