
Maharashtra weather update: राज्यात सध्या हवामानाची कोणतीही यंत्रणा सक्रिय नाही. यामुळे पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. शनिवार पर्यन्त तापमानात १ ते २ अंशांनी घट होणार आहे. यानंतर तापमानात वाढ होणार आहे. आकाश मुख्यत: निरभ्र राहणार आहे, अशी माहिती पुणे वेध शाळेने दिली आहे.





