
Weather Update Today : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात कोकण, सातारा, पुणे आणि मुंबईत आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर आता पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबचा पट्टा तयार होत आहे. यामुळे पुढील चार दिवस राज्यसह देशातील अनेक राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.




