
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होण्यास सध्या तरी पोषक स्थिती नाहीय. त्यामुळं महाराष्ट्रात १७ ऑगस्टपर्यंत तरी पावसाची शक्यता नाही. १९ ऑगस्टनंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आठ दिवसांच्या तयारीसह शेतीची कामं करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. विदर्भ, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामाची पीकं बहरली आहे. त्यामुळं गेल्या १० दिवसांपासून पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. याशिवाय राज्यातील शहरी भागांमध्येही उकाडा वाढत असल्याचं दिसून येत आहे.









