[ad_1]
जर वादळी वारे आणि वीजांचा कडकडाट होत असेल तर अशा स्थितीत घराबाहेर पडू नये. जर तुम्ही घराबाहेर असाल तर सुरक्षित स्थळी जाणे हा त्यावरचा उपाय आहे. खास करून एखाद्या बंद इमारतीत, घरात किंवा गुहा सदृश्य ठिकाणी तुम्ही आसरा घेऊ शकतात. हे ठिकाण सुरक्षित मानले जाते. जर तुम्हाला अशी जागा सापडली नाही तर उंच असलेल्या ठिकाणी थांबणे टाळा. विशेष करून विद्युत पोल, झाडे, पत्र्याचे शेड या ठिकाणी जाणे टाळावे. कारण या गोष्टी विजेला स्वत:कडे आकर्षित करत असतात.
[ad_2]
Source link
