
यावेळी ‘कॉफी विथ करण ८’च्या मंचावर क्वीझ राऊंड देखील झाला. या क्वीझमध्ये करण जोहर याने काजोलला प्रश्न विचारला की, ‘तुझ्या कोणत्या चित्रपटात राणी मुखर्जी पाहुणी कलाकार म्हणून दिसली होती?’ मात्र, काजोलला या प्रश्नाचे उत्तरच देता आले नाही. याचे उत्तर होते ‘कभी ख़ुशी कभी गम’. मात्र, काजोलला त्यावेळी चित्रपटाचे नावच लक्षात आले नाही. प्रश्नांची उत्तरे देता न आल्याने यावेळी वैतागलेली काजोल तडक या शोमधून बाहेर जाण्यासाठीच निघाली होती. मात्र, करणने तिला थांबवलं.







