
Khurchi Marathi Movie Trailer Out: सत्तेची लढाई दाखवणारा नवा कोरा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘खुर्ची‘ असे या चित्रपटाचे नाव असून, येत्या १२ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या आधी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमध्येच कथेची झलक प्रेक्षकांना पाह्यला मिळाली आहे. छोट्याशा आर्यांचा दमदार अंदाज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला आहे. हातात आणि गळ्यात सोन्याचे वजनदार दागिने, पांढरे कपडे आणि डोक्यावर टिळा या लूकमध्ये आर्यन अगदी छोटा राजकारणीच वाटत आहे. खुर्चीच्या या रोमांचक खेळात तो अनेक बड्या व्यक्तींना टक्कर देताना दिसणार आहे.







