
भारतीय कुस्तीपटू पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे नाव ‘खाशाबा’ असे असणार आहे. मात्र, या चित्रपटात खाशाबा जाधव यांची भूमिका कोण साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘खाशाबा’ चित्रपटाचं टीझर पोस्टर रिलीज करण्यात आलं असलं, तरी यात मुख्य अभिनेता कोण असणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये देखील सुवर्ण पदकामागे अभिनेत्याचा चेहरा लपवण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘खाशाबा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः नागराज मंजुळे करणार आहेत. तर, ज्योती देशपांडे या चित्रपटाच्या निर्मितीत सहाय्य करणार आहेत.






