Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशKerala Firing News | केरळमध्ये अमेरिकेसारखी घटना, माजी विद्यार्थ्याचा शाळेत घुसून गोळीबार!...

Kerala Firing News | केरळमध्ये अमेरिकेसारखी घटना, माजी विद्यार्थ्याचा शाळेत घुसून गोळीबार! | Navarashtra (नवराष्ट्र)

Kerala Firing News | केरळमध्ये अमेरिकेसारखी घटना, माजी विद्यार्थ्याचा शाळेत घुसून गोळीबार! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

केरळमध्ये अमेरिकेसारखी घटना, माजी विद्यार्थ्याचा शाळेत घुसून गोळीबार!

जगन नावाचा माजी विद्यार्थी त्रिशूरच्या विवेकोदयम शाळेत आला. स्टाफ रूममध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने बॅगेतून बंदूक काढून अनेक वर्गात जाऊन विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना घाबरवले.

त्रिशूर : अमेरिकेत क्षुल्लक क्षुल्लक कारणावरुन गोळीबार (Firing) करण्यात येत असल्याच्या घटना नेहमी समोर येतात. यावरुन अनेकदा चिंता व्यक्त केली जाते. या समस्येवर योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, आता अशीच एक घटना आता भारतात घडली आहे. शिक्षणाच्या बाबतील अग्रेसर मानल्या जाणाऱ्या केरळमधील त्रिशूरमध्ये (Thrissur)  मंगळवारी एका खासगी शाळेतील माजी विद्यार्थ्याने शाळेत बंदूक घेऊन प्रवेश केला आणि गोळीबार करत कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना घाबरवले, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झालं नाही.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

जगन नावाचा माजी विद्यार्थी त्रिशूरच्या विवेकोदयम शाळेत आला. स्टाफ रूममध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने बॅगेतून बंदूक काढून अनेक वर्गात जाऊन विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना घाबरवले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर लगेचच जिल्हा दंडाधिकारी व्ही.आर. कृष्णा तेजा यांनी शाळेत पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकारातील हे एकमेव प्रकरण असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी पालकांना काळजी न करण्याचे आवाहन करून आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments