
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय क्विज शो म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’ पाहिला जातो. या शोच्या १६व्या सिझनचे सूत्रसंचालन बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन करताना दिसत आहेत. नुकताच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये अमिताभ यांनी दिवंगत दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे कौतुक केले. एकदा रतन टाटा यांनी पैसे उधार मागितले असल्याचे सांगितले. ते ऐकून हॉट सीटवर बसलेले स्पर्धक देखील आश्चर्यचकीत झाले.