Sunday, August 30, 2026
Homeक्रीडाK Hoysala: विजयाचे सेलिब्रेशन करताना तरुण क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | पुढारी

K Hoysala: विजयाचे सेलिब्रेशन करताना तरुण क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | पुढारी

K Hoysala: विजयाचे सेलिब्रेशन करताना तरुण क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | पुढारी

[ad_1]

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकचे माजी क्रिकेटपटू के होयसला (वय ३४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मैदानावर विजयाचा आनंद साजरा करताना त्याच्या छातीत दुखू लागल्यानंतर तो मैदानातच बेशुद्ध पडला. एजिस दक्षिण विभागीय स्पर्धेच्या सामन्यानंतर ही दुर्दैवी घटना गुरूवारी (दि.२२) घडली. K Hoysala

एजिस दक्षिण विभागीय स्पर्धेतील कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यातील सामना बंगळुरू येथील आरएसआय क्रिकेट मैदानावर झाला. या सामन्यात कर्नाटकच्या विजयानंतर आनंद साजरा करत असताना छातीत दुखू लागल्याने होयसाला मैदानातच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णवाहिकेने बंगळुरू येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. K Hoysala

रुग्णालयाचे डीन डॉ. मनोज कुमार म्हणाले की, के होयसला यांना रुग्णालयात आणले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. पोस्टमार्टमनंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वृत्ताने भारतीय क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.
के होयसाला हा अष्टपैलू खेळाडू होता, मधल्या फळीत फलंदाजी करत असे. तसेच तो वेगवान गोलंदाजीही करत होता. होयसाला २५ वर्षांखालील गटात कर्नाटककडून खेळला आहे. याशिवाय तो कर्नाटक प्रीमियर लीगमध्येही खेळला होता.

कर्नाटक सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी त्याच्या निधनाबद्दल सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. “एजिस साउथ झोन स्पर्धेदरम्यान कर्नाटकचा क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज होयसला यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. या दु:खाच्या प्रसंगी आम्ही त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत आहेत.

हेही वाचा 

The post विजयाचे सेलिब्रेशन करताना तरुण क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू appeared first on पुढारी.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments