Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशJharkhand Gangrape Case | झारंखड अत्याचार प्रकरणी धक्कादायक माहिती, स्पॅनिश महिलेवर नराधमांनी...

Jharkhand Gangrape Case | झारंखड अत्याचार प्रकरणी धक्कादायक माहिती, स्पॅनिश महिलेवर नराधमांनी अडीच तास केला अत्याचार; धमकावलं, सामानही लुटलं! | Navarashtra (नवराष्ट्र)

Jharkhand Gangrape Case | झारंखड अत्याचार प्रकरणी धक्कादायक माहिती, स्पॅनिश महिलेवर नराधमांनी अडीच तास केला अत्याचार; धमकावलं, सामानही लुटलं! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

झारखंडमधील दुमका येथे सात जणांनी मिळून स्पॅनिश महिलेवर अत्याचार केला. मिळालेल्या माहितीुप्रमाणे या सात नराधमांनी मिळून तब्बल 2.30 तास महिलेवर अत्याचार केला.

1 मार्च रोजी झारखंडमधे घडलेल्या सामुहिक अत्याचाराच्या (Jharkhand Gangrape Case) घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. झारखंडमधील दुमका येथे स्पॅनिश ट्रॅव्हल ब्लॉगर असलेल्य महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देशात संतपाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणाशी संबंधित एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे, जे ऐकून तुमचा संताप आणखी वाढेल. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील दुमका येथे सात जणांनी मिळून स्पॅनिश महिलेवर आधी हल्ला केला. या नराधमांनी तब्बल 2.30 तास महिलेवर अत्याचार केला. याव्यतिरिक्त, आरोपींनी महिला आणि तिच्या पतीला धमकावलं, लाथाबुक्यांनी मारहणही केली.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय?

शुक्रवारी 1 मार्चला झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 300 किमी अंतरावर असलेल्या हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ही महिला भारत फिरायला आली होती. झारखंड मध्ये पोहचल्या नंतर जेव्हा ती तिच्या पतीसोबत तंबूत रात्र घालवत होती तेव्हा तिच्यावर सात लोकांनी मिळून अत्याचार केला. या घटनेची पोलिसांत तक्रार करण्यात आली.  २ मार्च रोजी पहाटे २:०५ वाजता सामुदायिक आरोग्य केंद्रात महिलेचे जबाब नोंदवण्यात आला. यानंतर आयपीसी कलम ३७६ डी (सामूहिक बलात्कार) आणि ३९५ (दरोडा) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments