
अमिताभ यांनी किस्सा सांगताना म्हटले की, “मी आणि जया त्यावेळी जंजीर चित्रपटात एकत्र काम करत होतो. त्यावर्षी चित्रपट हिट झाला तर परदेशात फिरायला जाण्याचा बेत आम्ही आखला होता. मी आणि जयाने लंडन कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे काही झाले तरी लंडनला फिरायला जायचे आम्ही ठरवले होते. त्यानंतर मी माझ्या वडिलांना मित्रांबरोबर लंडनला जाणार असल्याचे सांगितले. वडिलांनी मी कोणाबरोबर चाललो आहे असे विचारले. मी मित्रांची यादी दिल्यानंतर त्यात जयाचे नाव ऐकल्यावर त्यांनी जायचे असेल तर लग्न करून जा, असे सांगितले आणि वडिलांची आज्ञा प्रमाण मानून दुसऱ्याच दिवशी लग्नाचा निर्णय घेत आम्ही लंडन गाठले”








