Javed Akhtar : ‘श्रीराम व सीता हे फक्त हिंदूचे दैवत नाही तर.…’, मनसेच्या दिपोत्सवातील जावेद अख्तरांच्या विधानामुळे चर्चा

0
21
Javed Akhtar : ‘श्रीराम व सीता हे फक्त हिंदूचे दैवत नाही तर.…’, मनसेच्या दिपोत्सवातील जावेद अख्तरांच्या विधानामुळे चर्चा


दरम्यान, हिंदू देवदेवता यांच्या बद्दल बोलतांना अख्तर म्हणाले, मी अशा देशात जन्मलो आहे की, ज्या देशात राम आणि सीता यांचा जन्म झाला आहे. श्रीराम आणि सीता हे फक्त हिंदूचे दैवत नाहीत. तर देशातील सर्व नागरिकांचे दैवत आहे. काही गोष्टी जरा खुल्या पद्धतीनं बोलल्या पाहिजेत. ज्याला रामायण आणि महाभारताविषयी माहिती नसेल तो हिंदुस्तानी कसा असेल? रामायण, महाभारत हा इतिहास. काहींची यावर धार्मिक आस्था आहे. आमच्यासारख्या नास्तिकांनाही गर्वाची बाब आहे की माझा जन्म त्या देशात झाला जो रामचंद्र आणि सीताचा देश आहे. रामकथा सीतेशिवाय पूर्म होऊच शकत नसल्याचे देखील अख्तर म्हणाले.



Source link