Jalgaon crime : जळगावात वाळू माफियांचा निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत पोहचले दवाखान्यात

0
17
Jalgaon crime : जळगावात वाळू माफियांचा निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत पोहचले दवाखान्यात


Jalgaon Sand mafiya crime : जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी कहर केला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी वाळू माफियांवर धाड टाकत मोठी कारवाई केली. दरम्यान, या कारवाई विरोधात वाळू माफीयांनी कासार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या सोबतच शासकीय वाहनांवर मोठी दगडफेक देखील केली. या घटनेत सोपान कासार हे गंभीर जखमी झाले असून रक्तबंबाळ अवस्थेत ते थेट दवाखान्यात पोहचले. ही घटना मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास नशिराबाद येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहे.



Source link