Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशIran Election | राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूनंतर आता इराणमध्ये होणार मुदतपूर्व...

Iran Election | राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूनंतर आता इराणमध्ये होणार मुदतपूर्व निवडणुका | Navarashtra (नवराष्ट्र)

Iran Election | राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूनंतर आता इराणमध्ये होणार मुदतपूर्व निवडणुका | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इराणच्या राज्यघटनेनुसार, विद्यमान अध्यक्षांचे पदावर असताना मृत्यू झाल्यास 50 दिवसांच्या आत सरकारच्या तिन्ही शाखांच्या प्रमुखांनी मिळून नवीन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया निश्चित करणे आवश्यक आहे. आता या नियमानुसारच पुढील कार्यवाही केली जात आहे.

तेहरान : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी (Ebrahim Raisi) यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे इराणमध्ये सध्या अध्यक्षपद हे रिक्त आहे. आता नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. इराणी सरकारच्या 3 शाखांच्या प्रमुखांनी 28 जून रोजी अध्यक्षांची निवडणूक घेण्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार, आता लवकरच निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

इब्राहिम रईसी हे पूर्व अझरबैजानला भेट देत होते. या दरम्यान, इराणची राजधानी तेहरानपासून 600 किलोमीटर अंतरावर असलेल्या अझरबैजानच्या सीमावर्ती शहर जोल्फाजवळ त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अध्यक्षपद हे रिक्त असल्याने त्यासाठी आता घडामोडी घडत आहेत. त्यातच राजधानी तेहरानमध्ये अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत निवडणुकांबाबतचा निर्णय घेण्यात आला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments