Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशIran Airstrike On Pakistan | इराणने पाकिस्तानवर केला हवाई हल्ला, दोन मुलांचा...

Iran Airstrike On Pakistan | इराणने पाकिस्तानवर केला हवाई हल्ला, दोन मुलांचा मृत्यू! हादरलेल्या पाकिस्तानने दिली ‘ही’ धमकी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इराणने पाकिस्तानवर केला हवाई हल्ला, दोन मुलांचा मृत्यू! हादरलेल्या पाकिस्तानने दिली ‘ही’ धमकी

इराणने पाकिस्तानच्या भूमीवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराणच्या हल्ल्यात बलुची दहशतवादी संघटना जैश अल-अदलच्या दोन तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणच्या सरकारी मीडियाने ही माहिती दिली आहे.

पाकिस्तानमधुन एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणने पाकिस्तानात एअर स्ट्राईक केली आहे. या हवाई हल्लात दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. इराणने बलुची दहशतवादी गट जैश अल-अदलच्या दोन तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला (Iran Airstrike On Pakistan) केला आहे. नुकतचं इराणच्या एलिट रिव्होल्युशनरी गार्ड्सने इराक आणि सीरियामधील दहशतवादी लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. आता पाकिस्तावर झालेल्या हा हल्ला सूड उगवण्यासाठी केल्याचं म्हणण्यात येत आहे. कारण, काही काळापूर्वी बलुची दहशतवादी गटाने पाकिस्तानी सीमेवर इराकी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता.

हे सुद्धा वाचा

बलुची दहशतवाद्यांचे केलं लक्ष

इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला करून बलुची दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. इराकी राज्य माध्यमांनी जास्त माहिती शेअर केलेली नाही. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवादी लक्ष्यांवर हल्ला करण्यात आल्याचे इराणच्या सर्वोच्च सुरक्षा संस्थेने म्हटले आहे. बलुचिस्तान प्रांताचे माहिती मंत्री जान अचकझाई यांनी या हल्ल्यांचा इन्कार केला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क शाखेने आयएसपीआरच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा करण्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या लष्करी विंगने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments