
[ad_1]
भारतातील पहिली आणि आशियातील पाचवी मेट्रो प्रणाली कोलकात्यात सुरू झाली. याची सुरुवात बरोबर 40 वर्षांपूर्वी 24 ऑक्टोबर 1984 रोजी झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सकाळी 10:15 वाजता कोलकाता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रो ट्रेनचे (India First Under Water Metro Tunnel In Kolkata) उद्घाटन करणार आहेत. कोलकात्याच्या हुगळी नदीखाली बांधण्यात आलेला बोगदा हावडा मैदान आणि एस्प्लेनेडला जोडेल. हा जागतिक दर्जाचा प्रकल्प आहे, जो 15,400 कोटी रुपये खर्चून पूर्ण झाला आहे. या बोगद्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो पृष्ठभागापासून 33 मीटर खाली आहे.
हे सुद्धा वाचा
हा पाण्याखालील मेट्रो बोगदा हावडा मैदान-एस्प्लेनेड विभागादरम्यान धावेल. पाण्याखालील मेट्रो बोगदा हुगळी नदीच्या पातळीपासून 32 मीटर खाली धावेल. कोलकाता मेट्रो हावडा मैदान-एस्प्लेनेड बोगदा हा भारतातील कोणत्याही नदीखाली बांधला जाणारा पहिला वाहतूक बोगदा आहे. हुगळी नदीखालचे ५२० मीटरचे अंतर मेट्रो ४५ सेकंदात पार करेल अशी अपेक्षा आहे.
[ad_2]
Source link

