Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशINDIA Alliance | 'इंडिया' नाव का ठेवलं? सात दिवसांत मागितले न्यायालयाने उत्तर;...

INDIA Alliance | ‘इंडिया’ नाव का ठेवलं? सात दिवसांत मागितले न्यायालयाने उत्तर; आता… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘इंडिया’ नाव का ठेवलं? सात दिवसांत मागितले न्यायालयाने उत्तर; आता…

‘इंडिया नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स’ या विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ या संक्षिप्त नावाचा वापर करण्यावर बंदी घालण्याच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र आणि विविध विरोधी पक्षांना शेवटची संधी दिली आहे.

नवी दिल्ली : ‘इंडिया नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स’ या विरोधी पक्षाच्या ‘इंडिया’ या संक्षिप्त नावाचा वापर करण्यावर बंदी घालण्याच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र आणि विविध विरोधी पक्षांना शेवटची संधी दिली आहे. कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती मनमोहन सिंग आणि न्यायमूर्ती मनमीत पी. एस. अरोरा यांच्या खंडपीठाने या जनहित याचिकांवर एका आठवड्यात उत्तर दाखल करण्यास बजावले आहे.

‘इंडिया’ हे संक्षिप्त रूप वापरून राजकीय पक्ष आपल्या देशाच्या नावाचा अवाजवी फायदा करून घेत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवरील सुनावणीची तारीख वाढवण्यास हायकोर्टाने नकार देत 10 एप्रिल रोजी याचिकेवर सुनावणी करून निकाल देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले. यासोबतच विरोधकांना एक आठवड्यात उत्तर दाखल करण्याची शेवटची संधीही न्यायालयाने दिली आहे




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments