Thursday, August 20, 2026
Homeक्रीडाIND vs SA : टीम इंडियाला धक्का; सरावात शार्दूल जखमी | पुढारी

IND vs SA : टीम इंडियाला धक्का; सरावात शार्दूल जखमी | पुढारी

IND vs SA : टीम इंडियाला धक्का; सरावात शार्दूल जखमी | पुढारी

[ad_1]








केपटाऊन, वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाला शनिवारी मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूरला नेटमध्ये फलंदाजी करताना खांद्याला दुखापत झाली. (IND vs SA)

केपटाऊनमध्ये 3 जानेवारीपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही, अशी शक्यता आहे; पण आवश्यक असल्यास त्याच्या दुखापतीची तीव्रता स्कॅनद्वारे ठरवली जाईल. त्याच्या दुखापतीसाठी स्कॅनची गरज आहे की नाही हे सध्या निश्चित नाही. पण ठाकूरला खूप त्रास होत होता आणि नेट सेशनमध्ये गोलंदाजीही करता आली नाही. (IND vs SA)

आज थ्रो डाऊन नेटवर सराव करणारा ठाकूर हा पहिला खेळाडू होता, पण सत्र सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांत त्यांच्या खांद्यावर चेंडू लागला. फिजिओने त्याच्या खांद्यावर बर्फाचा पॅक लावला, पण त्यानंतर तो पुन्हा नेटमध्ये सराव करायला गेला नाही. पहिल्या कसोटीच्या दुसर्‍या डावात ठाकूरला शॉर्ट बॉलचा बचाव करता आला नाही. चेंडू लागताच तो वेदनेने विव्हळताना दिसला.

ही दुखापत किरकोळ असू शकते; परंतु ही दुखापत किती लवकर बरी होते हे पाहणे बाकी आहे. पहिल्या कसोटीत तो प्लेईंग-11 चा भाग होता. ठाकूरने पहिल्या कसोटीत अवघ्या 19 षटकांत 100 हून अधिक धावा दिल्या होत्या आणि फलंदाजीतही त्याची कामगिरी चांगली नव्हती. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-0 ने पिछाडीवर आहे. पहिल्या कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला होता. आता दोन्ही संघ केपटाऊन येथे 3 ते 7 जानेवारी दरम्यान नवीन वर्षाची कसोटी खेळतील. (IND vs SA)

हा सामना जिंकून रोहित शर्माच्या सेनेला मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवायची आहे. मात्र, आजपर्यंत भारताने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. 6 सामन्यांपैकी 4 हरले आहेत, तर 2 सामने अनिर्णीत राहिले आहेत.

हेही वाचा : 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments