Monday, September 14, 2026
Homeसाताराफलटणमध्ये वाढत्या घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण; पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन

फलटणमध्ये वाढत्या घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण; पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन

फलटण | २०२३ मध्ये फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ३२ घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती, त्यापैकी १४ गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे उलगडण्यात आला. तथापि, २०२४ मध्ये घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या घट झाली असली, तरी अलीकडच्या कालावधीत अशा गुन्ह्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. २६ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, मालोजीनगर, कोळकी (ता. फलटण) येथील श्री. सोनाजी अश्रुबा घोळवे यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात आरोपींनी घरात प्रवेश करून ४१,५०० रुपये किमतीचे रोख रक्कम आणि चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनेचा तपास सुरू असून, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.

महिनानिहाय घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांचा आकडा (२०२४):

जानेवारी: १ गुन्हा

फेब्रुवारी: १ गुन्हा

मार्च: ० गुन्हे

एप्रिल: ३ गुन्हे

मे: १ गुन्हा

जून: २ गुन्हे

जुलै: ३ गुन्हे

ऑगस्ट: ० गुन्हे

सप्टेंबर: ३ गुन्हे (सद्यस्थितीत)

एप्रिल महिन्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांपैकी एक गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणात आरोपी स्वप्नील उर्फ काळु सुरेश जाधव आणि निखील उर्फ बाळू सुरेश जाधव, हे दोघे रा. तावडी, ता. फलटण यांना अटक करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यातील चोरीच्या घटनांमध्ये आतापर्यंत तीन गुन्ह्यांची नोंद झाली असून, यापैकी कोळकी येथील दहिवडी चौक ते कोळकी रोडवर असलेल्या एका हार्डवेअर दुकानातून तब्बल १३.७१ लाख रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेले आहे.

पोलिसांचे आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना घरफोडी-चोरीच्या घटनांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही मूलभूत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी खालील सल्ल्यांचे पालन करून सुरक्षितता सुनिश्चित करावी:

  1. बाहेर जाताना घराचे कुलूप व्यवस्थित लावा: आपण घरी नसल्यास शेजारील विश्वासू व्यक्तींना त्याबद्दल माहिती द्या.
  2. वॉचमन आणि CCTV चा वापर करा: अपार्टमेंट किंवा मोठ्या संकुलांमध्ये वॉचमनची नेमणूक करावी आणि CCTV कॅमेरे लावावेत. CCTV च्या DVR ची सुरक्षितता राखावी, ते घरापासून दूर ठेवा जेणेकरून चोरीच्या वेळी DVR चोरीला जाऊ नये.
  3. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या: घरात मौल्यवान दागिने, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम ठेवणे टाळावे.
  4. संशयास्पद हालचाली त्वरित कळवा: कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ ११२ या क्रमांकावर पोलिसांना माहिती द्या.

फलटण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेचे योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. घरफोडी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही, गस्त वाढवणे आणि स्थानिक नागरिकांसोबत सामंजस्य वाढवण्याचे पाऊल उचलले आहे.

फलटण परिसरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षिततेसाठी योग्य खबरदारी घेणे हीच यावर प्रभावी उपाययोजना असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments