Monday, September 14, 2026
Homeसाताराबौद्ध महासभेची पिंपरद शाखा उद्घाटीत, समाजातील मान्यवरांचा सन्मान

बौद्ध महासभेची पिंपरद शाखा उद्घाटीत, समाजातील मान्यवरांचा सन्मान

फलटण – बौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजात एकात्मता आणण्यासाठी, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पिंपरद शाखेचे उदघाट्न भन्ते धम्मानंदबोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी प्रा. शिवाजी सावंत, भारतीय बौद्ध महासभेचे सातारा पूर्व जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोहिते, उपाध्यक्ष दत्तात्रय खरात, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहन हांगे, सज्जन खरात, संतोष खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरदच्या वतीने विविध शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या समाजातील मान्यवरांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. भारतीय बौद्ध महासभेच्या पिंपरद शाखेस परवानगीपत्र जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोहिते आणि उपाध्यक्ष दत्तात्रय खरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून झाली. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून बौद्ध धम्माच्या महत्त्वावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर भाष्य केले. प्रास्ताविक आणि स्वागत सचिन मोरे यांनी केले तर आभार शरद मोरे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विक्रांत मोरे, विकास मोरे, निरज मोरे, संतोष मोहिते, बापूराव मोरे, विकी मोरे, अमर मोरे, विजय बनसोडे, इंद्रजित मोरे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments