Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशImran Khan | इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाचा दिलासा; सायफरप्रकरणी कोठडीमध्ये ठेवणे...

Imran Khan | इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाचा दिलासा; सायफरप्रकरणी कोठडीमध्ये ठेवणे बेकायदेशीर | Navarashtra (नवराष्ट्र)

Imran Khan | इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाचा दिलासा; सायफरप्रकरणी कोठडीमध्ये ठेवणे बेकायदेशीर | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टाचा दिलासा; सायफरप्रकरणी कोठडीमध्ये ठेवणे बेकायदेशीर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना सायफर गैरव्यवहार प्रकरणी मोठा दिलासा दिला. इम्रान खान यांना या प्रकरणी कोठडीतच ठेवण्याबाबत काढलेली अधिसूचना बेकायदेशीर असल्याचे इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सांगितले.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना सायफर गैरव्यवहार प्रकरणी मोठा दिलासा दिला. इम्रान खान यांना या प्रकरणी कोठडीतच ठेवण्याबाबत काढलेली अधिसूचना बेकायदेशीर असल्याचे इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सांगितले. ही अधिसूचना 29 ऑगस्ट रोजी काढण्यात आली होती.

इम्रान यांच्यावरील खटल्याला मान्यता देणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात खान यांच्यावतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठाने कोठडीबाबतची मार्गदर्शक सूचनाही दिली. याच न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठाने पूर्वी इम्रान खान यांच्याविरुद्ध रावळपिंडीतील अदियाला तुरुंगातील खटल्याला मंजुरी दिली होती.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments