
सनी चित्रपटांच्या संघर्षाविषयी बोलताना म्हणाला की, ‘मी चित्रपटांमध्ये काम केले कारण मला अभिनेता व्हायचे होते. मी माझ्या वडिलांचे चित्रपट पाहिले आणि त्यांच्यासारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट मला करायचे होते.’ तेथे उपस्थित राज कुमार संतोषी म्हणाले की, ‘मला असे वाटते की इंडस्ट्रीमध्ये सनीच्या टॅलेंटला न्याय मिळाला नाही. पण ईश्वराने केले.’ राजकुमार संतोषी यांचे बोलणे ऐकून सनी देओलला अश्रू अनावर झाले.








