Friday, September 4, 2026
Homeसातारासातारा आणि सोलापूर जिल्ह्यात चालू हंगामात सर्वाधिक भाव देणार, लोकनेते हिंदूराव नाईक...

सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात चालू हंगामात सर्वाधिक भाव देणार, लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर साखर कारखाना ; रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याने आत्तापर्यंत गाळपासाठी आलेल्या उसाला नेहमी चांगला भाव देण्याच्या प्रयत्न केला आहे . याही वर्षी सातारा व सोलापूर जिल्ह्यातून येणाऱ्या ऊसाला सर्वाधिक भाव देणार असल्याची ग्वाही दिली .

स्वराज ग्रीन पावर अँड फ्युएल लिमिटेड संचालित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याची गळीत हंगाम २०२४- २०२५ साठी मिल रोलरचे पूजन कारखाने चे संस्थापक रणजितसिह नाईक निंबाळकर व अँड जिजामाला नाईक निंबाळकर व ताराराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की येणाऱ्या गळीत हंगामासाठी तयारी सुरू पुर्ण झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहिजे ही भुमिका घेऊन हा दुष्काळी भागातील जनते साठी कारखाना उभा केला आहे. तालुक्यातील इतर कारखाना पेक्षा आता पर्यंत सर्वात दर देणार कारखाना ठरला आहे. चालु हंगामात सुध्दा सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वात दर देणार आहे. सर्वांच्या सहकार्यातून देशातील सर्वाधिक उत्पन्न घेणारा कारखाना करण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या उसाच्या दर तसेच इतर सुविधा कारखाने मार्फत दिले जातात .या वर्षी अधिकाधिक गाळप करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,शेतकरी हा केंद्र बिंदू मानून आपण काम करीत आहे तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला घालून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे संस्थापक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

यावेळी रोलर पूजन समारंभाला संचालक विनय ठाकूर, उषा घाडगे, संजय पवार, अमर जगताप, राजू रणवरे, शिवाजी पाटील, मनोज होलम, गणपती नराळे, प्रदीप मोहिते, नितीन कर्णे, सचिन सावंत, रोहित नागटिळे, दादा जगदाळे, विनय पुजारी, सचिन शेंडगे व इतर कर्मचारी उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments