विधिज्ञ ऍड. असीम सरोदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

0
1
विधिज्ञ ऍड. असीम सरोदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुणेः ‘राईट टू लव्ह’ चळवळीचे मार्गदर्शक आणि कायदेशीर सल्लागार ऍड. असीम सरोदे सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि प्रेम! त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि तात्विक मार्गदर्शनामुळे अनेकांना त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविण्याची प्रेरणा मिळाली आहे.

‘राईट टू लव्ह’ या महत्त्वपूर्ण चळवळीच्या यशामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या कायदेशीर सल्ल्यामुळे समाजात प्रेम, आदर, आणि स्वातंत्र्य यांसारख्या मूल्यांचे बीजारोपण झाले आहे. न्यायासाठी संघर्ष करणाऱ्यांना त्यांनी नवी दिशा दाखवली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांना न्याय मिळाल्याचे उदाहरण समाजात दिसून येते.

आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राईट टू लव्ह’ चे ध्येय पुढे नेत आहोत, आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला प्रचंड आत्मविश्वास मिळाला आहे. अशा विद्वान नेतृत्वाच्या सहवासात काम करणे हे आमच्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे.

त्यांना उत्तम आरोग्य, यश, आणि दीर्घायुष्य लाभावे हीच मनोकामना!