
संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा सहकुटुंब हसू या म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करीत आलेली आहे. सर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यापैकी एक कलाकार म्हणजे गौरव मोरे.








