Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशFiring in America | अमेरिकेत नववर्षाच्या सुरुवातीलाच शाळेत गोळीबार, एका विद्यार्थ्याचा मृत्यू,...

Firing in America | अमेरिकेत नववर्षाच्या सुरुवातीलाच शाळेत गोळीबार, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, पाच जण जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अमेरिकेत नववर्षाच्या सुरुवातीलाच शाळेत गोळीबार, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, पाच जण जखमी

अमेरिकेतील आयोवा येथील पेरी हायस्कूलमध्ये गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

अमेरिकेत गोळीबाराचं (America Hospital Shooting) सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. वारंवांर येथे गोळीबाराच्या घटना घडत असतात. नवीन वर्ष सुरू होऊन 4 दिवस होत नाहीत तर पुन्हा अमेरिकेत गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेत नुकतचं ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या, तेव्हा पहिल्याच दिवशी शाळेत गोळीबारची घटना घडली आहे. आयोवा राज्यातील एका शाळेत गोळीबार करण्यात आला असुन या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्यानंतर  संशयित शूटरने स्वतःवर गोळी झाडली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील आयोवा येथील पेरी हायस्कूलमध्ये गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ही घटना घडली. सार्वजनिक सुरक्षा विभागाचे अधिकारी मिच मॉर्टवेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments