
‘फर्रे’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा शाळेतील मुलांवर आधारित असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी केले आहे. अलिझेहसोबत चित्रपटात झेन शॉ, साहिल मेहता, प्रसन्ना बिश्त, रोनित बोस रॉय आणि जुही बब्बर सोनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल.










