
आपल्या तालावर प्रत्येक बॉलिवूड कलाकाराला ठेका धरायला लावणारी नृत्यदिग्दर्शिका म्हणजे फराह खान. तिने आतापर्यंत २०० हून अधिक गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका म्हणून ओळखली जाते. पण फराहचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. तिला हालाखीचे दिवस काढावे लागले होते. आज फराहचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…








