Saturday, August 15, 2026
Homeसातारासाथीच्या आजारांनी डोके वर काढले ;दिवसेंदिवस फलटण शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होताना...

साथीच्या आजारांनी डोके वर काढले ;दिवसेंदिवस फलटण शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

फलटण : फलटण शहरामध्ये सध्या डेंगू चिकनगुनिया गोचीड यासारख्या साथीच्या रोगाने डोके वर काढले असून फलटण नगरपालिकेचे स्वच्छता मोहिमेचे काम अत्यंत धीम्या गतीने चालले आहे.स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याने त्याचा परिणाम स्वच्छतेवर होत असल्याचे बोलले जात आहे.त्यातच मागील आठवड्यात फलटण नगरपालिकेचे अनुभवी ऑफिस कर्मचारी यांची पदोन्नतीवर बदल्या झाल्याने त्यात अधिकच भर पडली आहे.फलटण शहरामध्ये यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच दमदार पावसाने हजेरी लावली पावसाळ्या नंतर होणाऱ्या डेंगू चिकनगुनिया गोचीड मलेरिया इतर साथीच्या रोगांनी डोकेवर काढले आहे. दिवसेंदिवस फलटण शहरामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. फलटण नगरपालिकेची स्वच्छता मोहीम स्वच्छता कर्मचाऱ्यांची अत्यल्प असलेली संख्यांमुळे अत्यंत धीम्यागतीने चालली असून याचा परिणाम साथीच्या रोगावर होत आहे तरी फलटण नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी या नात्याने मुख्याधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून ताबडतोब उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments