Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशElection Commission Hearing on NCP | निवडणूक आयोगात सुनावणीदरम्यान अजित पवार गटाचा...

Election Commission Hearing on NCP | निवडणूक आयोगात सुनावणीदरम्यान अजित पवार गटाचा मोठा दावा, पाहा सविस्तर रिपोर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

Election Commission Hearing on NCP | निवडणूक आयोगात सुनावणीदरम्यान अजित पवार गटाचा मोठा दावा, पाहा सविस्तर रिपोर्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

निवडणूक आयोगात सुनावणीदरम्यान अजित पवार गटाचा मोठा दावा, पाहा सविस्तर रिपोर्ट

Election Commission Hearing on NCP : राष्ट्रवादीची लढाई आता निवडणूक आयोगात पोहचल्यानंतर आता 6 तारखेला सुनावणी झाल्यानंतर पुढील सुनावणी आज होणार होती. आता अजित पवार गटाचे वकील नीरज किशोर कौल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. अजित पवारांची अध्यक्ष म्हणून निवड योग्य आणि कायद्याला धरून आहे. एकच व्यक्ती पक्षावर दावा करू शकत नाही, असा युक्तिवाद नीरज किशोर कौल यांनी केला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावरून आज पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे वकील निवडणूक आयोगात उशिराने उपस्थित राहिल्याने सुनावणी 15 मिनिटे उशिराने सुरू झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट आज युक्तिवाद करणार असल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे. अजित पवार गटाने गेल्या सुनावणीवेळीदेखील युक्तिवाद केला होता. त्यानंतर आज पुन्हा निवडणूक आयोग अजित पवार गटाची भूमिका ऐकून घेणार आहे. अजित पवार गटाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर शरद पवार गटाची भूमिका निवडणूक आयोग ऐकणार आहे. दोघांच्या युक्तिवादातील मुद्द्यांचा विचार करून निवडणूक याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे.

नीरज किशोर कौल यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments