Earthquake in China | चीनमध्ये मोठा भूकंप; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 200 पेक्षा अधिकजण जखमी, भूकंपाची तीव्रता… | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Earthquake in China | चीनमध्ये मोठा भूकंप; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 200 पेक्षा अधिकजण जखमी, भूकंपाची तीव्रता… | Navarashtra (नवराष्ट्र)


चीनमध्ये मोठा भूकंप; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 200 पेक्षा अधिकजण जखमी, भूकंपाची तीव्रता…

चीनमध्ये मोठा भूकंप (Earthquake in China) झाला. या भूकंपाने चीनचे जनजीवन अक्षरश: विस्कळीत केले असून, या भूकंपात वित्तहानीसह मोठी जीवितहानीही झाली आहे. चीनमध्ये झालेल्या भूकंपात आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला असून, 220 जण जखमी झाले आहेत.

बीजिंग : चीनमध्ये मोठा भूकंप (Earthquake in China) झाला. या भूकंपाने चीनचे जनजीवन अक्षरश: विस्कळीत केले असून, या भूकंपात वित्तहानीसह मोठी जीवितहानीही झाली आहे. चीनमध्ये झालेल्या भूकंपात आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला असून, 220 जण जखमी झाले आहेत. चीनच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती दिली आहे.

चीनच्या गान्सू प्रांताला मध्यरात्री भूकंपाचा धक्का बसला. ज्यामध्ये तिथल्या आणि जवळच्या किंघाई प्रांतात अनेक इमारती कोसळल्या. ‘यूएस जिओलॉजिकल सर्व्हे’ने म्हटले आहे की, भूकंपाची तीव्रता 5.9 आणि खोली 10 किलोमीटर होती. सकाळपासून येथे मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सरकारने एक बचाव पथक पाठवले आहे जे स्थानिक बचाव पथकाला मदत करत आहे.






Source link