[ad_1]
पुणे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून (दि २९) तीन दिवस पुणे दौऱ्यावर येत आहेत. मुर्मू या कृषि विद्यापीठ, लष्करी वैद्यकीय महाविद्याल आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेटी देणार आहेत. मुर्मू यांचे दुपारी लोहगाव विमान तळावर आगमन होणार आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, दक्षिण मुख्यालयाचे अधिकारी, विभागीय आयुक्त आदि मान्यवर त्यांचे स्वागत करणार आहेत. दरम्यान, मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त पुढील दोन दिवस वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे याची दाखल घेत नागरिकांनी आपल्या इच्छित स्थळी जावे असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे आयुक्त विजय कुमार मगर यांनी केले आहे.
[ad_2]
Source link
