Friday, October 2, 2026
Homeसाताराडॉ .बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर ; साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर

डॉ .बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर ; साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर

. फलटण : डॉ .बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी या संस्थेला व कृष्णाथ (उर्फ ) दादासाहेब मल्हारी चोरमले यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे . तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार कुरवली बुद्रुक येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाला घोषित झाला

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत , समाज कल्याण क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती किंवा स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून पात्र व्यक्ती व संस्थांना २०१९ – २०२० , २०२० – २०२१ , २०२१ – २०२२ , २० २२ – २०२३ वर्षाचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत .

महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना सन्मानित करण्यात येते, यामध्ये फलटण नगरीचे सुपुत्र  कृष्णाथ उर्फ दादासाहेब मल्हारी चोरमले यांना महाराष्ट्र शासनाचा “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण” पुरस्कार जाहीर झाला आहे. महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष असणारे दादासाहेब चोरमले हे गेली २५ वर्षे दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्यरत असून दिव्यांग मुलांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पुनर्वसनासाठी काम करीत आहेत. तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार शासनाने जाहीर केलेला आहे. सध्या ते मुंजवडी येथील श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध राजकिय सामाजिक, शैक्षणिक आणि क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हे विविध पुरस्कार नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस, जमशेदजी भाभा नाटयगृह, एनसीपीए मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे १२ मार्च २०२४ रोजी प्रदान करण्यात येणार आहेत.

सदर पुरस्कारांमध्ये सातारा जिल्ह्यातील खालील नमूद व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे.

.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments