Diabetes and Heart Disease : मधुमेह असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा दुप्पट धोका! आत्ताच सावध व्हा

0
11
Diabetes and Heart Disease : मधुमेह असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा दुप्पट धोका! आत्ताच सावध व्हा


Know How Diabetes Causes Heart Disease : आजकाल मधुमेह आणि हृदयविकाराचा धोक्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बदलच्या जीवनशैलीमुळे खाण्या-पिण्याच्या सवयी हे या समस्यांचे मुख्य कारण बनले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, मधुमेह आणि हृदयविकार हे दोन्ही आजार एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत. तज्ज्ञांच्या मते मधुमेह असलेल्या व्यक्तींना हृदयविकार होण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा खूप जास्त असते. ज्या मेटाबॉलिक असंतुलनामुळे रक्तातील साखर वाढते यामुळे रक्तवाहिन्या आणि हृदयाला हानी पोहोचवते.

Add Zee News as a Preferred Source

 

डायबिटीज हृदयासाठी का घातक आहे?

जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण सतत वाढत राहते तेव्हा धमन्यांमध्ये सूज आणि कडकपणा येतो, याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे रक्तवाहिन्या आखूड होतात आणि हृदय तसेच मेंदूमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. मधुमेहामध्ये उच्च रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा या समस्या सामान्य असतात. या सर्व समस्या एकत्रिपणे झाल्यामुळे “मेटाबॉलिक सिंड्रोम” होण्याची शक्यता असते, जे हळूहळू हृदयाला नुकसान पोहोचवते.

 

आरोग्यावर काय परिणाम होतो?

डायबिटीज असलेल्या जवळपास 70% रुग्णांचा मृत्यू हृदयरोगामुळे होतो, जसे की हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअर. पण योग्य काळजी आणि वेळीच उपचार घेतल्यास हे टाळता येऊ शकते. एका संशोधनानुसार रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल काटेकोरपणे नियंत्रणात ठेवल्यास हृदयरोगाचा धोका खूप कमी होऊ शकतो. SGLT2 इनहिबिटर्स आणि GLP-1 रिसेप्टर एगोनिस्टसारख्या आधुनिक औषधांमुळे केवळ साखर कमी होत नाही, तर हृदय आणि किडनीचेही संरक्षण होते.

 

यापासून वाचण्यासाठी तुम्ही स्वतः स्वतःची काळजी घ्यायला हवी. नियमितपणे हृदयाची तपासणी करा. नियमितपणे व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा. तुमच्या आहारात फायबरयुक्त संतुलित अन्नपदार्थांचा समावेश करा. धूम्रपान करणे टाळा. 

 

 

 

 

१. मधुमेह असला तरी हृदयरोग टाळता येऊ शकतो का?

उत्तर : होय, पूर्णपणे टाळता येऊ शकतो असं नाही, पण रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल काटेकोरपणे नियंत्रणात ठेवल्यास हृदयरोगाचा धोका 50-70% पर्यंत कमी होऊ शकतो.

 

 

२. मधुमेहाच्या रुग्णांचा मृत्यू मुख्यतः कशामुळे होतो?

उत्तर : मधुमेह असलेल्या जवळपास 70% रुग्णांचा मृत्यू हृदयविकारामुळे (हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअर) होतो. म्हणूनच मधुमेहाला “सायलेंट हार्ट किलर”ही म्हणतात.

 

 

३. हृदय आणि किडनी दोन्हींचे संरक्षण करणारी औषधे कोणती?

उत्तर :  SGLT2 इनहिबिटर्स (उदा. डापाग्लिफ्लोझिन, एम्पाग्लिफ्लोझिन) आणि GLP-1 रिसेप्टर एगोनिस्ट (उदा. लिराग्लुटाइड, सेमाग्लुटाइड) ही आधुनिक औषधे साखर कमी करतातच, पण हृदय आणि किडनीला अतिरिक्त संरक्षणही देतात.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link