
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधून वाईट बातमी समोर आली आहे. ‘डायरेक्टर्स स्पेशल’, ‘एडेलू मंजुनाथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या कन्नड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. त्यांच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता गुरुप्रसाद यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.







