Tuesday, September 15, 2026
Homeसाताराभारतीय संविधान दिनानिमित्त फलटणमध्ये उत्साहात कार्यक्रम

भारतीय संविधान दिनानिमित्त फलटणमध्ये उत्साहात कार्यक्रम

फलटण – भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी मा. श्री. राहुल धस, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील महाडिक, फलटण शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नलवडे, तसेच तहसीलदार कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री. अभिजीत सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. डीवायएसपी राहुल धस यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित आमदारांचा सहभाग
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांनीही या ठिकाणी हजेरी लावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

भारतीय संविधान दिनाची महत्त्वाची जाणीव
या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्त्व आणि त्याची उद्दिष्टे याबद्दल जागरूक करण्यात आले. फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments