
ही घटना संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित केले. बिस्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (वय १२ वर्षे), अफरोज जावेद शेख (वय १२ वर्षे), जावेद शेख (वय १४ वर्षे) व अबरार जावेद शेख (वय १२ वर्षे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहेत.






