Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशChampions Trophy Final: भारत-न्यूझीलंड फायनलवर तब्बल 5 हजार कोटींचा सट्टा, दाऊद कनेक्शन...

Champions Trophy Final: भारत-न्यूझीलंड फायनलवर तब्बल 5 हजार कोटींचा सट्टा, दाऊद कनेक्शन उघड; दिल्लीत मोठी कारवाई

Champions Trophy Final: भारत-न्यूझीलंड फायनलवर तब्बल 5 हजार कोटींचा सट्टा, दाऊद कनेक्शन उघड; दिल्लीत मोठी कारवाई

[ad_1]

Champions Trophy Final: दुबईत आज भारत आणि न्यूझीलंड संघात चॅम्पिअन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यावर फक्त क्रिकेटप्रेमीच नाही तर सट्टाबाजाराचंही लक्ष आहे. यादरम्यान दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने मोठी कारवाई करत पाच सट्टेबाजांना अटक केली आहे. या सर्वांनी सेमी-फायनल सामन्यावर सट्टा लावला होता. त्यांची चौकशी केली असताना धागेदोरे दुबईपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. त्यातूनच अंतिम सामन्यावर तब्बल 5 हजार कोटींचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे. इतकंच नाही, दाऊद इब्राहिमची ‘डी कंपनी’ दुबईत झालेल्या मोठ्या सामन्यांमधील सट्ट्यात सहभागी आहे. 

एका प्रकरणात दोन सट्टेबाजांची ओळख प्रवीण कोच्चर आणि संजय कुमार अशी पटली आहे. दोघांनीही सेमी-फायनल सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दोघांनाही लॅपटॉप आणि मोबाईल फोनच्या आधारे सट्टा लावताना रंगेहाथ पकडण्यात आलं. पोलिसांनी यावेळी त्यांच्याकडून सट्टा लावण्यासाठी वापरले जाणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत. 

प्रवीण कुमारने बेटिंग आयडी तयार करण्यासाठी आणि नंतर पंटर्सना विकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या  lucky.com या बेटिंग वेबसाईटच्या आधारे एक मास्टर आयडी तयार केला होता. हा गट प्रत्येक व्यवहारावर 3 टक्के कमिशन घेत होतं. ऑफलाइन बेटिंगसाठी आरोपीने फोन कॉल्सचा वापर केला आणि बेटिंग रेटच्या आधारे नोटपॅडमध्ये नोंदी केल्या. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परवीन कोचर यांनी गेल्या दोन वर्षांपासून सट्टेबाजीचा व्यवसाय चालवण्यासाठी दरमहा 35 हजारांना घर भाड्याने घेतलं होतं. प्रत्येक सामन्याच्या दिवशी त्यांना 40 हजार रुपयांचा नफा होत असे. चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की, हे संपूर्ण नेटवर्क दुबईतून नियंत्रित केलं जातं.

इतर बुकी कोण आहेत?

छोटू बन्सल: पश्चिम दिल्लीचा रहिवासी असून त्याने कॅनडामध्ये एक बेटिंग अॅप विकसित केले. तो आता दुबईमध्ये राहतो. इतरांनी त्याचे अॅप भाड्याने घेतले आणि बेटिंग लावण्यासाठी त्याचा वापर सुरू केला.

विनय: दिल्लीच्या मोती नगरचा रहिवासी, तो दुबईमध्येही आहे. तो थेट क्रिकेट मैदानावरून फीडबॅक देत असे.

या सिंडिकेटमध्ये सहभागी असलेल्या दिल्लीतील इतरांची ओळख बॉबी, गोलू, नितीन जैन आणि जितू अशी झाली आहे. दिल्लीतून अटक केलेल्या पाच जणांपैकी मनीष सहानी, योगेश कुकेजा आणि सूरज हे तिघे दुबईशी जोडलेले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 22 लाख रुपये रोख जप्त केलं.

मनीष सहानी हा टोळीचा मुख्य संचालक होता. तो बेटिंगमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचे आवाज रेकॉर्ड करायचा आणि बँक खात्यांद्वारे किंवा रोख रकमेद्वारे व्यवहार व्यवस्थापित करायचा. त्याने पोलिसांना सांगितलं की त्याने कोणत्याही मध्यस्थांना सामील केलं नाही आणि संपूर्ण बेटिंग ऑपरेशन स्वतः नियंत्रित करायचे.

चौकशीदरम्यान, तिन्ही आरोपींनी सांगितले की मन्नू मटका, अक्षय गेहलोत, निशू, रिंकू आणि अमन राजपूत यांनी ‘सत्ता’ बेटिंग ॲप भारताबाहेर विकसित केले.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments