Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रवेरुळ येथील 10 क्रमांकाचे लेणे चैत्यगृह आहे यातील तथागतांचे भव्य शिल्प चेहऱ्यावरील...

वेरुळ येथील 10 क्रमांकाचे लेणे चैत्यगृह आहे यातील तथागतांचे भव्य शिल्प चेहऱ्यावरील भाव आणि लेणी परिसरातील वातावरण मनःशांती देणारे आहे

वेरुळ म्हंटले की कैलास लेणी हे सर्वपरिचित समीकरण आहे, याखेरीस अजून वेरुळ लेण्या, त्यातील शिल्प यांच्या बाबतही आपण परिचित असाल, आज मात्र एका नव्या आणि गेल्या 8 वर्षांपासून अभ्यासकांची पावले वेरुळ कडे वळावी, इतिहास अभ्यासकच नाही तर खगोल अभ्यासकांना आपुलकीचा वाटावा असा नवा विषय आम्ही मांडतोय. वेरुळ येथील 10 क्रमांकाचे लेणे चैत्यगृह आहे यातील तथागतांचे भव्य शिल्प चेहऱ्यावरील भाव आणि लेणी परिसरातील वातावरण मनःशांती देणारे आहे. दरवरषी लेणी क्र 10 च्या लेणीत 10 मार्च 11 मार्च या दिवशी 4.30 ते 5.15 च्या दरम्यान चैत्यगृहाच्या समोरील झरोक्यातून सूर्याची किरणे भगवान बुद्धाच्या चेहऱ्यावर येऊन प्रकाशमान होतात ही तेजाची तेजाशी भेट आहे. याचे साक्षीदार आपण होऊ शकाल. हा सोहळा नक्की अनुभवा वेरुळच्या या किरणोत्सवाचे साक्षीदार व्हा.

प्राचीन काळातील स्थापत्य विशारदांना खगोलशास्त्राचे परिपूर्ण ज्ञान असल्याचा पुरावा प्रत्येक लेणीतून दिसून येतो. पण या खगोलशास्त्रीय अद्भुत आविष्काराचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची व्यवस्था त्या अनामिक स्थापत्य विशारदांनी आपल्यासाठी आजही करून ठेवली आहे.” उत्तरयानातील किरणोत्सव वर्षातून एकदाच आपल्याला पाहायला मिळतो. एकप्रकारे ही एका तेजाची दुसऱ्या तेजाशी भेटच आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments